मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अमरावतीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अमरावतीत
विविध योजना व विकासकामांचा आढावा

अमरावती, दि. 13 : ऑक्टोबर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (दि. 14) अमरावती दौ-यावर असून, त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता नियोजनभवनात शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत आढावा बैठक होणार आहे.
त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 14 ऑक्टोबरला सकाळी 9.30 वाजता नागपूर येथून बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन, स. 9.35 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान, सकाळी 9.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन सकाळी 10 वाजता नियोजनभवनात विविध योजनांबाबत आढावा बैठक, त्यानंतर दुपारी 12 वाजता अमरावती महापालिका आढावा बैठक, दुपारी 1 वाजता अमरावती जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक, दुपारी 2.30 वाजता मोटारीने बेलोरा विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 2.50 वाजता विमानतळावर आगमन व दु. 2.55 वा. विमानाने प्रयाण.करणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.