अमरावतीत  हजारो  आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

अमरावतीत  हजारो  आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक
 *सत्याग्रह आंदोलन ; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही ; तीन की .मी चा मूकमोर्चा ; चिमुकल्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
अमरावती, दि. 19 ऑक्टोबर
गोवारी जमात ही   आदिवासी आहे गोंडगोवारी ही जातच  अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपून राज्य शासनाने  ऐतिहासिक   निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज जिल्ह्यातील दहा हजार  आदिवासी गोवारी बांधवांनी   जिल्हा कचेरीवर धडक मूक मोर्चा काढून  जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केले . दरम्यान सायन्स कोर मैदानावरुन निघालेल्या मूक मोर्च्याची तीन किलोमीटर  पर्यंत  रीघ लागली होती
राज्यांतील आदिवासी  गोवारी समाज हक्काचा  लढा अनेक वर्षापासून  लढत आहे. आपल्या  न्याय मागणीसाठी 114 गोवारीचे बळी जाऊनही  शासनाने  गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही त्या अनुषंगाने हायकोर्टात प्रकरणसुद्धा दाखल केले होते अखेर . १४ ऑगस्ट रोजी २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला    बऱ्याच वर्षांचा संघर्षानंतर न्याय मिळाला आता  न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी  राज्य शासनाने करावी या मागणी साठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांचा  दुसरा  टप्पा पार पडला इर्विन चौकात डॉ बाबासाहेब आबेडकर व रानी दुर्गावती यांच्या पुतळ्याला मोहन राऊत , पुंडलिक चामलोट , मारोतराव वाघाडे भाऊराव चौधरी यांनी हारपण केले
मूक मोर्चात हजारो महीला आणी शाळकरी मुले
आदिवासी असतांना शासन  हक्काच्या सवलती पासून वंचित ठेवत आहे 23 नोव्हेबर 1994 रोजी  गोवारीच्या न्याय हक्काच्या मागणी साठी 114 गोवारी हत्याकांडात शहीद झाले होते त्यानंतर पुन्हा आता गोवारी समाज रस्त्यावर उतरला आहे आजच्या दुसऱ्या टप्याच्या सत्याग्रह आंदोलनात   आज सायन्स कोर मैदान येथून निघालेल्या मूक मोर्चात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आदिवासी गोवारी समाजाच्या महीला,  पुरुष , शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते प्रत्येक कार्यकर्त्यानी पिवळी टोपी पिवळा शेला परिधान केला होता
 जय सेवा , जय गोवारी , गोवारी एकता जिंदाबाद , गर्व से कहो हम आदिवासी हैं , भारत के मुल निवासी हैं असे फलक झळकत होते डफली च्या निनादात जिल्हा  कचेरीवर हे आदिवासी गोवारी बांधव धडकलें
पांच युवतीनी  दिले निवेदन*
आज हजारो गोवारी बांधव जिल्हा कचेरीवर धडकल्या नंतर वरुड येथील विशाखा सहारे , पूनम दूधकवरे, लसिका दरडे शामल नेहारे वैश्णवी नेहारे य़ा पांच युवतीनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले  आमच्या समाजाच्या तीन पिड्या सवलतीसाठी गारद झाल्या आम्हाला आमचा अधिकार व न्याय हक्क देत नसेल तर आम्ही हातात बंदूक घ्यावी का असा सवाल जिल्हाधिकारी यांना य़ा युवतीनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पर्यंत आमची मागणी आजच पोहचवीण्याची मागणी केली
य़ा सत्याग्रह आंदोलनात करण्यात आली यात आदिवासी गोवारी समन्वय समितीचे पुंडलिक चामलोट , मारोतराव वाघाडे मोहन राऊत , देविदास बासकवरे , सुदर्शन चामलोट भाऊराव चौधरी ,रामभाऊ शेंदरे   , मंगेश ठाकरे  उत्तमराव ठाकरे , रावसाहेब नेवारे , संजय नेवारे  ,  ,रामभाऊ शेंदरे   मनोहर अरतपायरे , नंदू सहारे ,क्रुष्णा चौधरी  मंगेश ठाकरे,  उत्तमराव ठाकरे , रावसाहेब नेवारे , रामकृष्ण भाले , मंगेश चौधरी , बंडू राऊत , शंकर नेवारे , मंगेश राऊत , रघुनाथ नेवारे , किशोर सहारे , नंदू शहरे  विनायक नेहारे , दीपक नेवारे , शंकर सहारे , पंकज नेहारे , मोहन सहारे , गणेश नेवारे , शिवाजी बरडे , प्रकाश शेंदरे , प्रशांत सोनवने , संजय नेवारे संतोष चचाने अरतपायरे रमेश गजबे ,यांच्या सह जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published.