मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानातचार हजारांवर शस्त्रक्रिया

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानातचार हजारांवर शस्त्रक्रिया

अमरावती, दि. २१
‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या अभियानात जिल्ह्यात डिसेंबर 17 ते सप्टेंबर 18 या कालावधीत 4 हजार 70 नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोतिबिंदू ही वाढत्या वयासोबत अपरिहार्यपणे येणारी बाब आहे मात्र त्यामुळे येणारे अंधत्व हे शस्त्रक्रियेनंतर दूर होते. ग्रामीण भागात या बाबत पुरेशी माहिती नाही तसेच नेत्रशस्त्रक्रियेवरील खर्चही अनेकांना परवडत नाही.

या पार्श्वभूमीवर डिसेंबर 18 ते जुलै 19 या कालावधीत अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या अभियानात जिल्ह्यात सप्टेंबर अखेर 4 हजार 70 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात अमरावती शहरातील 1 हजार 98 जणांचा समावेश असून चौदा तालुक्यातील 2 हजार 972 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेलया लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे.

अमरावती 198,अचलपूर 194, अंजनगावसूर्जी 145, चांदूररेल्वे 145,चांदूरबाजार 145, चिखलदरा 159,दर्यापूर 319, धारणी 85,धामणगावरेल्वे 243,मोर्शी 396, नांदगावखंडेश्वर 237,तिवसा 220, वरुड 333, भातकुली 186, अमरावती शहरी 1098, एकूण 4070.

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेचा लाभ घेणाऱ्यामध्ये 2 हजार 210 महिला, 1 हजार 860 पुरुष आणि 1 हजार 905 अनुसूचति जाती-जमातीच्या रुग्णांचा समावेश आहे. 1 हजार 55 शेतकऱ्यांनी मोतिबिंदू पासून मुक्ती मिळविली आहे. मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने या मिशनसाठी नेत्रचिकित्सक, तंत्रज्ञ इत्यादींच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून अनेक समाजसेवी संस्थादेखील या सेवाभावी कार्यात सहभागी होत आहे.

नेत्रतंत्रज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, शस्त्रक्रियेसंबंधी सर्व अधिकारी, तज्ञांनी मिळून असंख्य रुग्णांना दृष्टी प्रदान केली आहे. मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात चाललेल्या या नेत्रयज्ञात असंख्य गरजूंना दृष्टी व जीवन जगण्याची आशा प्रदान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.