रा.सु.गवई यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रा.सु.गवई यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती दि २९ ऑक्टोबर

दिवंगत नेते रा. सू. गवई यांचे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रा.सु.गवई स्मारकासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्रयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्रयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अमरावती येथून आमदार सुनील देशमुख, अमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठकीत सहभागी झाले होते.मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले की, बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करताना स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात यावी. याशिवाय हे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असल्याने स्मारकाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अमरावती विदयापीठाला देण्यात यावी. नियोजित कालमर्यादेत दादासाहेब गवई यांच्या स्मारकाची उभारणी राज्य शासनामार्फत करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
रा.सु.गवई स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील मौजा म्हसला येथील ३.९४ हेक्टर जागेत करण्यात येणार आहे. स्मारकस्थळी रा. सु. गवई यांचा पूर्णाकृती पुतळा, त्यांचा जीवनपट उलगडणारे दालन, शैक्षणिक, औद्योगिक व व्यावसायिक दृष्टीने कन्व्हेंशन सेंटर, एक हजार व्यक्तींच्या क्षमतेचे मोठे श्रोतागृह, दोनशे व्यक्ती क्षमतेचे छोटे श्रोतागृह, परिसंवादासाठी कॉन्फरन्स हॉल, खुले थियटर, अतिथीगृह असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.