शाळाविरोधी धोरणामूळे 2 नोव्हेंबर ला शाळा बंद

शाळाविरोधी धोरणामूळे 2 नोव्हेंबर ला शाळा बंद
परिक्षांकरीता शाळेच्या इमारती देणार नाही : शिक्षण संस्था संघाचा इशारा
अमरावती- दि ३१ ऑक्टोबर
उद्योगपतींच्या कंपन्यांनी शैक्षणिक क्षेत्रात शिरकाव केल्यापासून शासनाची भुमीका मराठी माध्यमांच्या शाळांविरोधीत झाली आहे. शासनाच्या नवनवीन धोरणामूळे मराठी माध्यमांच्या शाळा डबघाईस आल्या आहेत. गोर-गरिबांना शिक्षण देणार्या शाळा अखेरची घटका मोजत आहे. शासनाच्या शाळाविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारला असल्याची माहिती अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी दिली आहे.पवित्र पोर्टलव्दारे कर्मचारी भरती प्रक्रीया रद्द करा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीची परवानगी संस्थांना द्या, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेत्तर अनुदान मिळावे, मंजुरभाडे प्रमाणप्रमाणे शाळा इमारत भाडे द्यावे, संपुर्ण शिक्षणकर शिक्षणक्षेत्रावर खर्च करावा, शालेय कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करा अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील शैक्षणिक संस्था व विविध शिक्षक, कर्मचारी संघटनांच्यावतीने महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडाळाच्या नेतृत्वात राज्यातील शाळा 2 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागण्या 30 दिवसात पुर्ण न झाल्यास शैक्षणिक सत्रातील सर्वच परिक्षांकरीता शाळा इमारतींचा वापर करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकर्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.