साऊरवासीयांचे तहसिलदारांच्या दालणात अर्धनग्न आंदोलन

साऊरवासीयांचे तहसिलदारांच्या दालणात अर्धनग्न आंदोलन
आठवडी बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
दि.1 टाकरखेडा संभु
येथुन जवळ असलेल्या साऊर येथील गावकरी आज गुरूवारी भातकुली तहसिलवर धडकले होते. आठवडी बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी येथे रेटूण धरण्यात आली.मात्र याबाबत प्रशासनाकडुन काही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी स्वतःचे कपडे काढुन तेथे अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
भातकूली तालुक्यातील साऊर येथे आठवडी बाजारात विशिष्ट समाजातील बांधवांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत त्यांना यापुर्वी प्रशासनाकडुन अतिक्रमण हटविण्याकरिता नोटिस देखील बजावण्यात आल्या. परंतु अतिक्रमण न हटल्याने गावकऱ्यांच्या मागणीवरून आज गुरूवारी पोलिस ताफ्यासह महसुलचे कर्मचारी साऊर येथे पोहोचले होते. परंतु या अतिक्रमणाचा पुन्हा विरोध झाल्याने सदर अतिक्रमण पथक कारवाई न करताच परतले.त्यामुळे गावातील नागरीकांनी रोष व्यक्त करीत सदर अतिक्रमण आजच हटविण्याच्या मागणीकरिता शेकडो नागरीक उपसंरपंच रामदास रहाटे,सोपान गुडधे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर धडकले होते.तहसिलदार अनुपस्थित असल्याने नागरीकांनी कपडे काढुन त्यांच्या दालणात ठिय्या दिला.जो पर्यंत अतिक्रमण हटणार नाही तो पर्यंत येथुन उठणार नाही अशी भुमिका नागरीकांनी घेतली होती.आंदोलनामध्ये श्रीकांत राठी,रामदास रहाटे,राजु रहाटे,उमेश वाकोडे, सोपान गुडधे, प्रदीप गौरखेडे,पोटे, शरद बोंडे, सुरेश कलाने, बंडु अतकरे, प्रभाकर राणे, शाम बोंडे,सतीश काळमेघ, रामदास झिजकार,संजय सावरकर, सलिम खॉ पठान, किसन किवटकर, मदन मापले,रमेश डाहाके,सुधारक कवाने, रोशन दिलीप दिवान,दिलीप चव्हान,दिनेश वाकोडे,भाष्कर चव्हान, ठाकरे,गौरव माहोड,देवेंद्र लांदे, किशोर मोहोड, अंकुश लिवकर ,संजय हरणे,पंजाब मापले,अनुप राहाटे,राजेश मेश्राम,दिलीप बोंडे,दिलीप सवई,विकास देशमुख, अजय बानाईत,श्रीकृष्ण विंचुरकर,देविदास सोळंके,संजय मनगटे,संजय हरणे, शुभम चोपडे, आदींचा समावेश होता

Leave a Reply

Your email address will not be published.