सावधान ! मध्यरात्री संत्रे जातात चोरीला

सावधान ! मध्यरात्री संत्रे जातात चोरीला
अमरावती दि -२ नोव्हेंबर
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा आता संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळेचोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला. त्याची फिर्याद पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार अचलपूर तालुक्यातील नायगाव ते चमक खुर्द मार्गातील छोटू ऊर्फ प्रवीण डोके यांच्या शेतातील ५० कॅरेटहून अधिक संत्री मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी तोडून रस्त्यावर आणून टाकली. सात हजार रुपयाची ही संत्री चोरून नेत असताना रस्त्याने अन्य वाहनांचा आवाज आल्याने चोरट्यांंनी तेथून पळ काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सदर घटनेची फिर्याद सरमसपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे
परिसरात रात्री व पहाटे गस्त लावण्याची मागणी प्रहारचे बबलू चरोडे यांनी केली आहे. सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. आधीच संत्र्याचे दर कोसळल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशातच चोरट्यांनी थेट संत्राबागांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे शेतकयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.