नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक वाद

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक वाद
तिवसा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांने ठोकले कार्यालयाला कुलूप
जिल्हाभरात पडसाद काम बंद आंदोलन
अमरावती-दि -२ नोव्हेंबर
तिवसा नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन गाडे व नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्यात गुरुवारी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयातच शहरातील विविध समस्या वरून शाब्दिक चकमक उडाली मात्र मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी आरोप करत नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी मला मारहाण केल्याचा आरोप करत आज शुक्रवारी तिवसा नगरपंचायतला कार्यालयाला कुलूप ठोकत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन दिले या घटनेचे जिल्हाभरात पडसाद उमटले असून अधिकारी सहित कर्मचारी वर्गाने तिवसा येथील घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलन सुरू आहे आहे तर दुसरीकडे तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी मुख्याधिकारी गाडे यांचे विरोधात तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मुख्याधीकारी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने मुख्याधिकारी गाडेवर कारवाईची मागणी केली आहे
आज शुक्रवार रोजी स्वतःच कुलूप ठोकून सर्व कर्मचारी मंडळींना अमरावती घेऊन गेले, या कुलूप ठोकल्यामुळे आज न प चे व नागरिकांचे कामकाज प्रभावित झाल्याने अध्यक्ष व नगरसेवक यांनी आज तिवसा पोलीस स्टेशन ला रितसर तक्रार दाखल केली, व याचा पंचनामा सुद्धा करण्यात आला ,  तिवसा पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय यांना कार्यवाहीची मागणी केली आहे.
तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात गाडे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे.या संदर्भात मुख्याधिकारी सचिन गाडे यांचेशी संपर्क साधावा असता त्यांनी उत्तर दिले नाही

Leave a Reply

Your email address will not be published.