५० व्या “मन कि बात “ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खानापूर येथे

५० व्या “मन कि बात “ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खानापूर येथे
अमरावती दि २३ नोव्हेंबर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन कि बात” या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी सवांद साधत आहे. येत्या रविवारी दि.२५ ला या कार्यक्रमाचा ५० व भाग आहे. हा कार्यक्रम बूथ स्थरावर ऐकण्यासाठी थेट प्रक्षेपण तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती मंदिर येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर नरेंद्र मोदी गेल्या ४९ महिण्यापासून १८ तास ३१३ विषयावर “मन कि बात ” या कार्यक्रमाद्वारे जनतेसोबत संवाद साधत आहे .संपूर्ण देशात वेगवेगळ्या भाषेत या कार्यक्रमाचे प्रसारण केल्या जात आहे. “मन कि बात ” प्रश्नोत्तरीमध्ये ज्यांच्या पत्राचे वाचन पंतप्रधानांनी केले त्यांचा सत्कार केला जाणार आहे. “मन कि बात ” कार्यक्रमाचा हा ५० वा भाग असून देशातील ५० प्रमुख ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्या जाणार आहे .एल.ई डी स्क्रीन वर हा कार्यक्रम दाखविला जाणार असुन या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे अध्यक्ष शिवदास कडूकार, सचिव प्रवीण राउत, कोषाध्यक्ष महेश सोनी, विनोद उकंडे, राजेश ठाकरे, अशोक निमजे, सरपंच प्रमोद अग्रवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या