शहरात 27 नोव्हेंबरला रोजगार मेळावा
सुमारे सव्वातीनशे जागा उपलब्ध
      अमरावती, दि. 23 : कौशल्य विकास विभाग व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दि. 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून, त्यात स्थानिक उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक कौशल्य विकास व रोजगार संचालक प्रफुल्ल शेळके यांनी दिली.
      मेळाव्याद्वारे इतर मोठया शहरातील उद्योगांकडून निवड होऊनही बाहेर जाण्यास इच्छुक नसल्याने अनेक उमेदवार रुजू होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळी स्थानिक स्तरावर उद्योगांचाच समावेश करून स्थानिक रोजगारनिर्मितीचा प्रयत्न आहे, असे श्री. शेळके म्हणाले.
     मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय पात्रतेच्या 325 पुरुष पदांची मागणी आहे. रेमंड उद्योगाकडून 50, व्हीएचएमकडून 25, श्याम इंडो फॅबकडून 100, गोल्डन फायबरकडून 50, दामोदर इंडस्ट्रीजकडून 100 पदांची मागणी आहे. उमेदवारांनी www. mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी व कंपनीची निवड करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या