३ किलोमिटरचे अंतर दाखविले ७ किलोमिटर.

३ किलोमिटरचे अंतर दाखविले ७ किलोमिटर.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा, प्रवासी संभ्रमात,रस्त्यांवरील किलोमिटरच्या चुकीच्या नोंदीसह गावांची नावेही चुकीचीच
टाकरखेडा संभु:-(वार्ताहार) संतोष शेंडे
टाकरखेडा संभू मार्गावरील किलोमिटरच्या फलकावरूनच प्रवासी तथा वाहनधारक प्रवासाच्या अंतराचा अंदाज येत असतात.त्यामुळे या मार्गावरील पूढील गावांचे निर्धारीत अंतर फलकावर टाकणे ही रस्ता असलेल्या यंत्रणेची जबाबदारी आहे.प्रवाशांच्या सुविधेकरिता सदर फलक लावणे अनिवार्यच असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे मात्र ३ किलोमिटरचे अंतर चक्क ७ किलोमिटर दाखविण्यात आले आहे.तर एका गावाचे नाव या विभागाने चुकीचे लिहीले आहे.त्यामुळे प्रवाश्यांची ही दिशाभुल नाही का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
प्रवासी व वाहनधारकांच्या सुविधा करिता रस्त्यांवर गावांची नावे आणि किलोमिटरचे फलक लावले जातात. मार्गावरील फलकावर असलेल्या नोंदीवर वाहनधारकांचा विश्वास असतो; परंतु टाकरखेडा  रामा ते साऊर या मार्गावरील फलकांवर दिशाभुल करणाऱ्या आहेत.टाकरखेडा संभू ते साऊर हे गाव केवळ ३ किलोमिटर असताना या फलकावर चक्क हे अंतर ७ किलोमिटर दाखविण्यात आले आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये अंतरावरून संभ्रम निर्माण होत आहे.तसेच अमरावती ते परतवाडा मार्गावरील आष्टी नजिक देवरी निपाणी फाटा आहे.तेथुन ३ किलोमिटर असलेल्या देवरी निपाणी गावाचे नाव देखील या विभागाने चुकीचे टाकले आहे.निपाणी ऐवजी नियानी असे करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये या फलकावरून चांगलाच घोळ निर्माण होत आहे.आजवर हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाला माहीत नसने ही गंभीर बाब आहे.तसेच या फलकावर अमरावतीचे चुकीचे अंतर दाखविण्यात आले आहे.अमरावती – परतवाडा मार्गावर प्रत्येक कि.मी.च्या दगडावर अंतराची नोंद आहे. एवढेच नव्हे तर जुन्या फलकावरसुध्दा नोंदी असुन नविन फलकही किलोमिटरच्या नोंदी दर्शवितात.बहुतेक जुने आणी नविन फलक शेजारी असुन नविन फलकावर नोंदलेले अंतर हे जुन्या फलकावरील अंतरापेक्षा एक किमीने जास्त आहे. वलगावच्या पुढे निघाले असता प्रत्येक थांब्यावर असलेला फलक हा वाहनधारकांसाठी संभ्रम निर्माण करणारा आहे.आष्टी थांब्यावर तर या चुकीच्या नोंदीमुळे प्रवासी चांगलाच गोंधळात पडू शकतो.आष्टी नजिक टाकरखेडा संभू फाट्यावरील एका नविन फलकावर अमरावतीचे अंतर २० कि.मी.तर त्या लगत असलेल्या जुन्या फलकावर १९ कि.मी.दाखवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या