ग्रंथपाल कर्मचाऱ्यांच्या अनुदानात वाढ  करा 

ग्रंथपाल कर्मचाऱ्यांच्या अनुदानात वाढ  करा
संघटनेची पालकमंत्र्यांना निवेदन
टाकरखेडा संभु (वार्ताहर) संतोष शेंडे
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या काही वर्षापासुन प्रलबिंत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मानधनावर होणारा खर्च अत्यल्प असुन या कर्मचाऱ्यांना या महागाईत आर्थिक सामना करावा लागत आहे शिवाय कर्मचाऱ्यांना संरक्षण देखिल नाही.त्यामुळे सदर मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने पालकमंत्र्याना देण्यात आले याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.खेड्या पाड्यात वाचणाची चळवळ कायम ठेवण्याचे काम सार्वजनिक वाचणालयाच्या माध्यमातुन केले जाते परंतु या वाचणालया मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प अशा २६ रू रोजानी काम करावे लागत आहे.शासनाकडुन  मिळालेल्या अनुदानातुन केवळ ५० टक्के खर्च केल्या जाते.तसेच या कर्मचाऱ्यांना शासकिय कवच देखिल नाही.त्यामुळे या कर्मचाऱ्याचे वेतन ऑनलाईन करण्यात यावे,कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागु करावी, कामगार नियमाप्रमाने कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा ,आदी प्रलंबीत मागण्या करिता कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा सुरु आहे.परंतु याची दखल न घेतल्याने आज कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री प्रविण पोटे यांची भेट घेतली.मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.या शिष्ठमंडळात विनोद मुंदे,किशोर पराते,राजेश शेंडगे,चंद्रकांत बोदडे,पत्रकार संतोष शेंडे, विनोद पांडे,प्रविण गढीकर आदी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या