बंदी असतांना डीजेद्वारे सी एम चषकाचा प्रचार

बंदी असतांना डीजेद्वारे सी एम चषकाचा प्रचार
अंजनगाव सुर्जी (ता.३) गजेंद्र मंडलिक
डीजे वाजवाण्यावर न्यायालयाने संपूर्ण बंदी आणल्यानंतर न्यायालयाचा आदेशाचा सन्मान राखूण अंजनगांव सुर्जी शहरात गणपती, दूर्गा विसर्जन कूठल्याही प्रकारे डिजे न वाजवता झाले.परंतू येथील स्थानीक भाजपा कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या या आदेशाला हर्ताळ फासत सि एम चषकाची जाहीरात करण्यासाठी चक्क अॕटोवर डीजे लावून प्रचार चालवल्याने याची तक्रार यूवा सेना शहरप्रमूख अक्षय गवळी यानी पोलीस स्टेशन ला करुण कारवाही करण्याची मागणि केली आहे.
दर्यापूर मतदार संघात भाजपातर्फे सि एम चषकाचे आयोजन १८ तारखेला करण्यात आले आहे. या मध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून ,जास्तित जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा यासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रचार व प्रसार करण्यासाठी भाजपा  कार्यकतर्ते जोमाने कामाला लागले आहे,आणि त्यासाठी ध्वनीक्षेपकाचाही ऊपयोग केला असून चक्क बंदी असलेल्या डिजेचा ऊपयोग होत असल्याने. सत्ताधारी पक्ष च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करित असल्याने नियम हा सर्वांसाठी सारखा असतो मुख्यमंत्र्यांना काही या बंधनातून वगळण्यात आले नाही त्यामुळे या प्रकारावर कारवाही करण्याची मागणी केली असून कारवाही न केल्यास अभिनव पध्दतीने आंदोलन करण्याचा ईशाराही युवासेना शहरप्रमूख अक्षय गवळी यांनी दिला आहे.त्यामूळे मित्र पक्षच एकमेकासमोर ऊभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे,
यासंदर्भात प्रभारी ठाणेदार नरेंद्र डंबाळे यांचेशी संपर्क केला असता. प्रचारासाठी कूठल्याही प्रकारचा ध्वनीक्षेपक वाजवण्याची परवानगी आजूनपर्यंत घेतली नसल्याचे सांगत यूवासेनेच्या निवेदन प्राप्त झाल्यानंतर कारवाही करण्यासाठी कर्मचारी गेले असता तोपर्यत डिजे काढून टाकण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या