अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला स्वच्छतेचा विसर

अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला स्वच्छतेचा विसर
स्वच्छतागृह माखले घाणीने
अंजनगाव सुर्जी (ता.३)गजेंद्र मंडलिक
 देशभरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्रशासन स्थरावर मोठा आटापिटा केल्या जात असताना स्थानिक तहसील कार्यालयात मात्र स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला असून सुमारे दहा वर्षांपूर्वी सभागृहसोबत बांधण्यात आलेले प्रसाधन व स्वच्छतागृह साफ़ केल्या जात नसल्याने कित्येक महिन्यापासून घाणीने माखले आहे हा प्रकार वारंवार चर्चेतून पुढे येत असतांना कारवाई केल्या जात नसल्याने तालुक्याच्या प्रमुख कार्यालयातच स्वच्छतेचा फज्जा उडविल्या जात असल्याचे बोलले जात आहे
 गत दहा वर्षांपूर्वी येथील तहसील कार्यालयात भव्य असे सभागृह बांधण्यात आले तेव्हा त्या सभागृहाच्या पश्चिम बाजूला सुसज्ज असे प्रसाधन व स्वच्छतागृह बांधण्यात आले परंतु मात्र ते बांधले तेव्हापासून तेथे पाणी व स्वच्छतेबाबत उपाययोजना केल्या गेल्या नाही आज या सभागृहाच्या एका भागात पुरवठा विभागाचे कार्यालय आहे त्यामुळे हे सभागृह केवळ सभेपुरतेच उपयोगाचे न राहता पूर्ण काळ येथे वापर सुरू असतो शिवाय या लगतच भूमी अभिलेख कार्यालय सुद्धा आहे असे असतांना सुद्धा स्वच्छता गृहाकडे प्रशासनाचे लक्ष नाही कामानिमित्त येणारे नागरिक व कार्यालयातील कर्मचारी स्वच्छतागृह घाणीने माखले असल्याने उघळयावरच आपला विधी आटोपतात हे विशेष
 सद्यस्थितीत शासनस्तरावर स्वच्छतेबाबत उपाययोजनेसाठी कडक पावलं उचलल्या जात असतांना तहसील विभागाला मात्र स्वच्छतेचा विसर पडल्याचे या निमित्ताने समोर येत असून कामानिमित्त येणारे नागरिक सुद्धा या अस्वच्छतेबाबत प्रशासनावर रोष व्यक्त करताना दिसतात मात्र येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या प्रशासनिक कामकाजाबाबत तालुक्यात समाधानी चर्चा असून एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचे नागरिक नाव काढतात तेव्हा त्यांनी या स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेबाबत पावलं उचलावी अशी आशा व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या