खाटीक विकास महामंडळाची शिफारस करणार
पालकमंत्र्यांची राज्यस्तरीय मेळाव्यात ग्वाही, १३० युवक-युवतींची नोंदणी
खाटीक विकास महामंडळाची शिफारस करणार
अमरावती, ता. ४ :
निरुपद्रवी व सोज्वळ खाटीक समाजाच्या आर्थिक
उत्थानाच्या दृष्टीने समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली जाईल, अशी
ग्वाही सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म व पर्यावरण राज्यमंत्री तथा
अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
विदर्भ खाटीक समाजसेवा समितीतर्फे श्रीसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन
येथे सोमवारी (ता.तीन) पार पडलेल्या राज्यस्तरीय उपवर-वधू, पालक परिचय व
समाजमेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे
अध्यक्ष दीपकराव घन होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. श्रीकांत
देशपांडे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधीर पारवे, संरक्षण विभागाचे
संचालक नेतराम ठगेला, निवृत्त पोलिस महानिरीक्षक आर. के. मराठे, एमआयडीसी
इंडस्ट्रीयल असोसिएशन अध्यक्ष किरण पातूरकर, अमृता हॅशरीजचे संचालक शरद
भारसाकळे, विश्वनाथ गोतरकर, विनोद गायकवाड, रमेश जाधव, विश्राम पवार,
संजय धनाडे यांसह निवृत्त मुख्य अभियंता जी. जे. पारधी, राजेंद्र
थितोडिया, दिलीप नीभोरकर, चांदूरबाजार नगरपरिषदेचे उपाध्यक्ष विजय
विलेकर, महापालिकेतील पक्षनेता सुनील काळे, नगरसेविका वंदना हरणे, जयश्री
कु-हेकर, नगरसेवक राजेश पड्डा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात
१३० युवक-युवतींनी नोंदणी करून परिचय दिला. समितीच्या महिला प्रतिनिधी
निर्मलाताई पारधे (रा. वरुड) यांनी पती प्रा. गोपाळराव पारधे यांच्या
स्मृतिप्रीत्यर्थ शिंभोरा मार्गावरील १६१४ चौरसफुटांचा प्लॉट समितीला
दान दिल्याची घोषणा समितीचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ लोयटे यांनी केली.
समाजाने शिक्षणावर भर देऊन आपणास नेमके काय करायचे आहे, हे सर्वप्रथम
निश्चित केले पाहिजे. १३ टक्के आरक्षणापैकी जास्तीत जास्त टक्का कसा
मिळेल, यासाठी समाजाच्या निवृत्त अधिका-यांनी तरुणांना मार्गदर्शन केले
पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.
खाटीक समाजाने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यावे. शासनाने
भाजीपाल्याप्रमाणे मटनविक्रीच्या फिरत्या हातगाड्यांना परवानगी द्यावी,
असे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे म्हणाले. समाजातील तरुणांनी उच्च
शिक्षणासह स्पर्धापरीक्षांना तसेच आगामी नोकर महाभरतीला सामोरे गेले
पाहिजे, असे आमदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले. राज्यात सर्वत्र असलेल्या
खाटीक समाजाला काळासोबत चालावे लागेल, उद्दीष्ट्य एक असताना वेगवेगळ्या
संघटनांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करीत समाजाची एकता व अखंडता कायम
राहिली पाहिजे, असे आमदार सुधीर पारवे म्हणाले. किरण पातुरकर व शरद
भारसाकळे यांनी उद्योग व व्यवसाय वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. नेतराम
ठगेला, आर. के. मराठे, संजय धनाडे, विनोद गायकवाड, विश्राम पवार आदींची
समयोचित भाषणे झाली. सर्वांना सोबत घेऊन समाज व विशेषतः तरुण
बेरोजगारांचा प्रश्न हाताळण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे दीपक घन यांनी
अध्यक्षीय भाषणात सांगितले. तत्पूर्वी, पाहुण्यांच्या हस्ते
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर
समाजातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नलीनी सदाफळे आणि
लक्ष्मणराव सदापुरे यांच्या स्वरगंध संगीत मंच (पुणे) आणि सुरसंगम
ऑर्केस्ट्रातफे गितांचा कार्यक्रम याप्रसंगी झाला. प्रास्ताविक
उपाध्यक्ष पुरुषोत्तम विरूळकर यांनी केले. सचिव गोपाल हरणे यांनी संचालन
करून आभार मानले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. लक्ष्मणराव कराळे, किसनराव माकोडे,
राजकन्याताई खंडारे, श्रीराम नेहर, राजाभाऊ लोयटे, भीमराव माकोडे,
सुधीरराव लसनकर, अशोकराव पारडे, मनोहरराव सदाङ्कळे, सुरेशराव वानखडे,
विजयराव हिवरकर, देवीदासराव माहोरे, राजेंद्र माकोडे, विनायकराव खराटे,
रामदासराव धनाडे, बाळाभाऊ हरणे, योगेशराव गोतरकर, देवराव कु-हेकर,
देवीदासराव माहुरे, प्रा. डॉ. श्रीराम माहुरे, प्रा. रमेशराव खंडार,
रामदासजी विलेकर, गणेशराव नेहर, दशरथराव कंटाळे, किशोर दुर्गे, विजय
पारडे, हरीश माहूरकर, गोपाळराव कंटाळे, अविनाशराव हिरेकर, शिवदासराव
कराळे, लक्ष्मणराव हिवराळे, आत्मारामजी कटारे, अनिता सदाफळे, अनिता
ढोके, राजेश हिरेकर, राजेश बिहार, ज्ञानेश्वर माहूरकर, अरविंद वानखडे,
विठ्ठल मदने, राजेंद्र मकोडे, संतोष मसने, नीलेश पारडे, चंद्रकांत
डोईफोडे, सुनील दुर्गे, नीलेश गायगोले आदींनी सहकार्य केले.