अमरावती – वलगाव मार्गावरील “ तो ” विद्युत पोल जिवघेणा

अमरावती – वलगाव मार्गावरील “ तो ” विद्युत पोल जिवघेणा
 विज वितरण कंपणीचे दुर्लक्ष
टाकरखेडा संभु (वार्ताहर) संतोष शेंडे
अमरावती ते वलगाव मार्गावरील वलगाव बसस्थानकावर असलेल्या विद्युत खांब जिवघेणा ठरत आहे.गेल्या एक महिण्यापासुन झुकलेल्या अवस्थेत असलेल्या या खांबाकडे विज वितरण कंपणीचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावती ते वलगाव हा वर्दळीचा रस्ता असल्याने दिवसरात्र या मार्गावरुन परतवाडा, दर्यापुर,अचलपुर, धारणी,चांदुरबाजार या मार्गावर जाणारी वाहने ये-जा करतात या मार्गावरील वलगाव बसस्थानका नजिक  विद्युत खांब पुर्ण झुकला आहे. त्यामुळे या विद्युत पोल वरील विद्युत कनेक्शन काढले आहे.१ महीण्यापुर्वी सदर कनेक्शन काढले असतांना सदर पोल देखिल काढणे आवश्यक होते.परंतु सदर पोल न काढल्याने हा पोल आता जिवघेणा झाला आहे. कोणत्याही क्षणी या पोलमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर पोल काढण्याची कारवाही त्वरीत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या