चिखलदरा येथील वन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ कोटी मंजूर

चिखलदरा येथील वन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ कोटी मंजूर
अमरावती दि २५ डिसेंबर
चिखलदरा येथील वन प्रशिक्षण केंद्राला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनविण्याच्या अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशिक्षण केंद्र नुतनीकरण प्रस्तावाला मान्यता दिली असून, सुमारे १३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे..
चिखलदरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान खा.आनंदराव अडसूळ यांनी सुधीर मुनगंटीवार यांना वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे दाखवून दिले होते. त्यानिमित्ताने वन प्रशिक्षण संस्थेला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र साकारण्यात यावे, अशी मागणी खा.अडसूळ यांनी केली होती. यासाठी लागणाऱ्या सर्व नैसर्गिक बाबी या ठिकाणी उपलब्ध आहेत. केवळ केंद्रामध्ये निवासी वसतिगृह, रुग्णालय, मेस, सुरक्षा भिंत, प्रशिक्षण वर्ग, पाणीपुरवठा व्यवस्था आदी सुविधांसाठी १२ कोटी ९२ लाख ८४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे एक छत्री नियंत्रणाखाली आलेल्या व्याघ्रप्रकल्पाच्या व प्रादेशिक वनविभागाच्या नवोदित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा खा.अडसूळ यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.