गोल्ड मेडलिस्ट भक्ती काळमेघ ची खेळी इंडिया साठी निवड

गोल्ड मेडलिस्ट भक्ती काळमेघ ची खेळी इंडिया साठी निवड
अमरावती दि २५ डिसेंबर
राष्ट्रीय जलतरणात सुवर्णपदक जिंकणारी अमरावती च्या श्री हनुमन व्यायाम प्रसारक मंडळाची जलतरणपटू भक्ती काळमेघचे कौशल्य बघून तिची केंद्र सरकारचा ऑलम्पिकपटु घडविणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेलाे इंडिया साठी निवड झाली आहे. असे यश मिळवणारी जलतरण या क्रीडा प्रकारातील ती विदर्भातील एकमेव खेळाडू ठरली आहे.
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्य राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भक्तीने १४ वर्षांखालील मुलींच्या १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक वैयक्तिक प्रकारात देशभरातील स्पर्धकांना मागे टाकून सुवर्णपदक जिंकले.तिचे जलतरणातील कौशल्य बघून खेलो इंडिया उपक्रमासाठी निवड करण्यात आली. सध्या जलतरण या क्रीडा प्रकाराकडे खेलो इंिडयाचे विशेष लक्ष असून त्यांना या क्रीडा प्रकारात देशाला पुढे न्यायचे असल्याने उदयोन्मुख जलतरणपटूंकडे विशेष लक्ष िदले जात आहे. मागील १० वर्षांपासून भक्ती एचव्हीपीएमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण केंद्रावर मुख्य प्रशिक्षक डाॅ. टाॅमी जोस, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. योगेश निर्मळ, डाॅ. प्रतिभा भोंडे, राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात िनयमितपणे सराव करीत असते. ितला जलतरणासाठी आई-वडिलांचेही सातत्याने प्रोत्साहन िमळत राहिले आहे. एचव्हीपीएम जलतरण केंद्रात भक्तीला संस्थेतर्फे सर्व सुविधा तसेच प्रशिक्षण निशुल्क दिले जाते हे विशेष.
राष्ट्रीय स्पर्धेत स्वर्णिम कामगिरी करणाऱ्या भक्तीचे मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी कौतुक केले. तसेच कोषाध्यक्ष डाॅ. सुरेश देशपांडे, डाॅ. रमेश गोडबोले, सचिव डाॅ. माधुरी चेंडके, प्रा. वसंत हरणे, प्रशिक्षक टाॅमी जोस, डाॅ. खंडागळे, डाॅ. निर्मळ, डाॅ. भोंडे, पालक आशिष व गौरी काळमेघ यांच्यासह सहकारी जलतरणपटूंनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.