संतोष शेंडे यांचा सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार

संतोष शेंडे यांचा सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार
प्रतिनीधी:- अमरावती
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भातकुली तालुका अध्यक्ष म्हणुन संतोष शेंडे यांची फेरनिवड करण्यात आल्याने त्यांचा अमरावती पंचायत समिती येथे सभापती वहीदाबी युसुफ शहा यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दोन्ही तालुक्यातील सरपंच सत्कार सोहळ्याला उपस्थित होती.
भातकुली तालुक्यातील रहीवासी असलेले संतोष शेंडे यांची मराठी पत्रकार संघाच्या संघटात्मक कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या आदेशावरून त्यांची तालुकाअध्यक्ष म्हणुन फेरनिवड करण्यात आली.या निवडीबद्दल सरपंच संघटनेने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.अमरावती पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाला अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती वहीदाबी युसुफ शहा उपस्थित होत्या तर कार्यक्रमाला व्यासपीठावर सत्कारमुर्ती संतोष शेंडे,सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे तसेच अमरावती व भातकुली तालूक्यातील सरपंचांची उपस्थिती होती. यावेळी गजानन बोंडे यांच्याहस्ते संतोष शेंडे यांचा शॉल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.देशाचा चौथा आधारस्तंभ असलेली पत्रकारीता सक्षम व्हावी,गावातील समस्यांचे निरासरण त्यांच्या माध्यमातुन होत असते.त्यामुळे अशा पत्रकारांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गजानन बोंडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला मुक्ता लोखंडे,शारदा बुथ, रंजना कथलकर, हीरेंद्र महल्ले, रहेमद खा पठाण, नंदकिशोर पणपालिया, धनराज गढपायले,विवेक चौधरी, गणेश ढबाले, मेघशाम घोंगडे, चंद्रशेखर गेडाम,रोशन झासकार,संजाब औंधकर, प्रभाकर धंदर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मोहन चव्हान यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद गुलाम नबी यांनी केले. यावेळी पंचासत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.