विद्यार्थ्यांनी फासले शिक्षणमंत्र्यांच्या पोस्टरला काळे

दि. ५ अमरावती/प्रतिनिधि –

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शुक्रवारी अमरावती जिह्याच्या दौऱ्यावर आले असताना एका महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर दोन विद्यार्थ्यांनी तावडे यांना उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत सरकारचे काय धोरण आहे ? असा प्रश्न केला त्यावर विनोद तावडे यांनी त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हवे असेल तर , घरी बसा. असा विचित्र सल्ला दिला तसेच या संपूर्ण प्रकारचे मोबाईल मध्ये शूटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या शिक्षणमंत्र्यांच्या अशा वागण्याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेतर्फे आज निषेध करण्यात आला. संघटनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पोस्टरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे फासले व घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देता त्यांना अटक करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.