पत्रकारांना हक्काची घरे मिळवून देऊ – जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची ग्वाही

पत्रकारांना हक्काची घरे मिळवून देऊ – जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची ग्वाही
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात

दि ७- अमरावती
आधुनिक काळात अनेक माध्यमे उपलब्ध असताना देखील वृत्तपत्रांचा खप वाढतोय ही चांगली बाब आहे. सोशल मीडियाच्या तुलनेत आजही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता टिकून आहे. समाजासाठी सातत्याने झटणाऱ्या पत्रकारांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करू आणि ज्यावेळी पत्रकारांसाठी काही करण्याची संधी मला मिळेल त्यावेळी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी केले. वर्षभरात पत्रकारांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.मंडल व दै.मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल होते. तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त संजय निपाणे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, जनमाध्यमचे प्रबंध संपादक प्रदीप देशपांडे, आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भक्ते आणि दै.मतदारचे प्रबंध संपादक दिलीप एडतकर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी लोकनायक बापूजी अणे पुरस्कार प्राप्त पत्रकार अनुप गाडगे यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुषगुच्छ देऊन तर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी पत्रकारांसाठी केलेल्या विविध महत्त्वपूर्ण कामाबद्दल त्यांचा जिल्ह्यातील समस्त पत्रकार बंधूंच्या वतीने जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख तसेच अन्य अतिथिंच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पूषगुच्छ देऊन सहृदय भव्य सत्कार करण्यात आला. अनिल अग्रवाल यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन दै.नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे यांनी केले तर शब्दांकन गौरव इंगळे यांनी केले होते.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलीस आयुक्त संजय बावीस्कर म्हणाले की, देशात कधी नव्हे तो आंतरिक सुरक्षेचा धोका वाढलेला आहे. अशा काळात प्रसारमाध्यमे आणि पत्रकारांनी आपली भूमिका देखील चांगली बजावणे हे कर्तव्य आहे. समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याची जशी खबरदारी पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे,तशीच काळजी ही पत्रकारांनी सामाजिक दृष्टीकोन बाळगून घेतली तर समाजाचे निश्चित आणि चांगले भले होईल असा विश्वास बावीस्कर यांनी यावेळी व्यक्त केला.समाजाचा आवाज दडपण्यासाठीच पोलिस दल तयार झाल्याचा समज आजही समाजातून कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत एखादी बातमी छापताना समाज स्वास्थ टिकवून राहण्यासाठी पत्रकारांनी देखील स्वत: काही नियम पाळणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी पत्रकारिता हा आरसा असून यात आपण जसे असू तसेच दिसणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दै.जनमाध्यमचे प्रबंध संपादक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारिता क्षेत्रात जिवघेणी स्पर्धा वाढली असून पत्रकारितेचे अवमुल्यन होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. गेल्या 45 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असून दर्पण पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात आज सोशल मिडीयाची सुज उतरली आहे. त्यामुळे पत्रकारितेतील अधोगती थांबवून दर्जा वाढविणे गरजेचे झाले असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

उदघाटन कार्यक्रमानंतर नागपूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय भक्ते व दै.मतदारचे प्रबंध संपादक दिलीप एडतकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना डॉ.भक्ते यांनी माध्यमेही ही समाजासाठी दिव्य शक्ती आहे. परंतु,त्याचा वापर हा टिआरपी वाढविणे आणि पैसा कमाविण्यासाठी होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सोशल मिडीयावर एखादी बातमीची माहिती मिळाली की ती पुर्ण बातमी वाचल्याशिवाय आणि पेपर हातात घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही. या समाधानात स्पर्श,वाचण्याचा आनंद,गंध ज्ञान आणि भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वर्तमान पत्रांचे भविष्य उज्ज्वल असून वृत्तपत्रातून संगित,नाटक,कला याला देखील वेगळे आणि हक्काचे स्थान मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. तसेच पत्रकारितेत महिलांचे प्रमाण देखील लक्षणीय वाढत आहे,ही चांगली बाब असून पत्रकारां’या भाषा व लेखणीत बदल होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपत असताना आपण रामशास्त्रींचा बाणा भिनविला पाहिजे.पण आपण रामशास्त्री होऊ नये याची काळजी पत्रकार आणि समाजमाध्यमांनी घेणे आवश्यक असल्याचे मत दै.मतदारचे प्रबंध संपादक दिलीप एडतकर यांनी व्यक्त केले.पत्रकारांसमोरील आव्हाने वेगळी आहेत आणि मालक -संपादकांसमोरील आव्हाने वेगळी आहेत. मात्र यातूनही सचोटीने मार्ग काढणे आवश्यक असल्याचे दिलीप एडतकर यांनी सांगितले. दै.मंडलचे प्रंबध संपादक अनिल अग्रवाल यां’या कार्याची प्रशंसा करताना त्यांनी उत्तम संघटनकौशल्य असल्याची प्रशंसा केली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. नवराष्ट्रचे उपसंपादक गौरव इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, अमरावती मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रफुल्ल घवळे,अरूण जोशी, उपाध्यक्ष चंदु सोजतिया,संजय शेंडे, त्रिदीप वानखडे, सुनील धर्माळे, संजय बनारसे, चंद्रप्रकाश दुबे, सुरेंद्र आकोडे, मनिष जगताप, अनुप गाडगे, प्रशांत गोळे, विवेक दोडके,सुधीर भारती, मंगेश तायडे,यशपाल वरठे, मुन्ना देवके, रूपेश देशमुख, राजेश सोनोने, दुर्वास रोकडे, संजय देशमुख, ऋषीकेश शर्मा, मनोहर परिमल, अतुल हंबर्डे, दयालनाथ मिश्रा, जितेंद्र दखने, शशांक नागरे, नासीर हुसैन,अमर घटाळे, दिलीप जवंजाळ, संदीप मानकर, मामा सुर्यवंशी, भूषण काळे, नयन मोंढे, अली अजगर दवावाला, अश्विन गुजर,समीर भाई,यावेळी महेश कथलकर, संजय पाखोडे, संतोष शेंडे, नितेश राऊत, अनिल मानकर, फिलिप टॉड, पदमेश जयस्वाल यांच्यासह शिवाजी महाविद्यालयातील जनसंवाद महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच भारतीय जनसंचार संस्थानचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.