भातकुलीच्या विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही : पालकमंत्री

भातकुलीच्या विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही : पालकमंत्री
शिवराय कुळकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
दि – ८ अमरावती
विद्यमान आमदाराने भातकुली तालुक्याची दुर्दशा केली असून सामान्य जनतेची लहान सहान कामे देखील होत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भातकुली येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणे अभिनंदनीय आहे व या कार्यात आम्ही सारे त्यांच्या पाठीशी आहोत असे उद्गार अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी भातकुली येथे काढले.
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या भातकुली जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्त हजारो लोकांच्या भरगच्च उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पिंप्री चिंचवड च्या माजी स्थायी समिती सभापती सीमाताई सावळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले, रविराज देशमुख, जेष्ठ नेते गंगाधरराव मालठाणे, भाजपा भातकुली शहर अध्यक्ष बाळासाहेब भजभूजे, बडनेरा विधानसभा प्रमुख मिलिंद बांबल, विनोद सवई, योगेश उघडे, विकास देशमुख, रक्षाताई विघे, राहुल बोरा, सतीश आठवले, रोहित काळे, श्रीकांत राठी मंचावर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले, भातकुली मध्ये विकासाऐवजी भकास राजकारण केले गेले. या दशकात भातकुली तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा झाला. काम न करता केवळ फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचा निर्लज्ज कार्यक्रम राबवला गेला. सामान्य माणसांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी वाली राहिलेला नाही. भातकुली तालुक्याचा भ्रमनिरास झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराय कुळकर्णी यांनी जनसंपर्क कार्यालय थाटून जनतेची कामे करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आम्ही या कामात त्यांच्या पाठीशी उभे आहोत. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. त्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय या परिसराचे शक्तिकेंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवराय कुळकर्णी म्हणाले, या मतदारसंघात केवळ खोट्या आश्वासनांचा सुकाळ होता. भातकुली शहर आणि तालुका भकास आहे. येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोणीच कानावर घेत नाही. पालकमंत्री, भाजपा नेते, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या पर्यंत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सातत्यपूर्ण काम करेल. आज उद्घाटन सोहळ्यालाच भातकुलीच्या जनतेने जो अपूर्व प्रतिसाद दिला त्यावरून अशा स्वरूपाच्या कामाची निकड होती, असे त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात सीमाताई सावळे यांनी वर्तमान लोकप्रतिनिधीच्या सवंग राजकारणाच्या पद्धतीवर तोफ डागली.
संचालन संदीप अंबाडकर यांनी केले. प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त भातकुलीतील पत्रकार संतोष शिंदे, मोहम्मद सादिक, दिनेश खेडकर, विक्रांत खेडकर, किशोर लेंडे, विनायक लकडे, आशिष दोरस यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन मिलिंद बांबल यांनी केले.
अमरावती मनपाचे स्थायी समिती सभापती विवेक कलोती, नगरसेवक प्रा. आशिष अतकारे, गंगाताई अंभोरे, पदमजाताई कौंडण्य, सुनंदाताई खरड, स्वातीताई कुळकर्णी, प्रणीत सोनी, रेखाताई भुतडा, वंदनाताई हरणे,प्रमिलाताई जाधव, सीमाताई बत्रा, गजानन जाधव, बत्रा,  अनिल आसलकर, राजा खारकर, मंगेश खोंडे, किशोर जाधव, उमेश निलगिरे, अन्नू शर्मा, डॉ. प्रताप तिडके, भाजपा ओबीसी मोर्चाचे योगेश वानखडे, भारतीताई मोहोकर, अतुल भेरडे, किरण अंबाडकर, योगेश निमकर, रमेश अंभोरे, तुषार अंभोरे, स्वप्नील हिवराळे, जितेंद्र कुरवाणे, राजाभाऊ लिखितकर, बाळू ठवकर, शिवा निंबर्ते, गजू मोहोड, अभय पांडे, मनोहर बुध, उज्वल अंबाडे, नरेंद्र काळसरपे, गजानन शेरोळे, बंडुभाऊ विघे, संजय वाठ, बाळू माहुलकर, अर्चना सहारे, सई कुळकर्णी, ज्योत्स्ना अंबाडकर, रोहित भैसने, चंद्रकांत खानझोडे, अविनाश देशपांडे, वरणगावकर, सतीश जुमडे, मुकेश उसरे, डॉ. वीरेंद्र ढोबळे, सुभाष भजभूजे, मनोज लोखंडे, विनोद बाभूळकर यांच्यासह मोठया संख्येत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.