पत्रकार दिनी आष्टी येथील आरोग्य केंद्रात रुग्णांना फळवाटप

पत्रकार दिनी आष्टी येथील आरोग्य केंद्रात रुग्णांना फळवाटप
भातकुली पत्रकार संघाचे आयोजन
टाकरखेडा संभू ( वार्ताहर)
     दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील  रुग्णांना फळ वाटप केले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
   आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा राज्यभर पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित भातकुली तालुका पत्रकार संघाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य केंद्र आष्टी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल देशमुख हे होते.
     प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांच्या विचारांवर आणि आजच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकण्यात आला. तद्नंतर लगेच कार्यकारिणीच्या हस्ते रुग्णालयातील उपस्थित सर्व रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,महेश माहूरे,विजय मुंडाले,अनिरूध्द ऊगले,ऊज्वल भालाधरे,सुनिल इंगडे,अशोक पाटील, सतिश मेश्राम,कु.सिमा वावरे,कु.अर्चना काबंळे,सुनिता आठोले,आशा खर्चान,आर.एन.अग्रवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष शेंडे,विक्रांत खेडकर, मो.सादिकभाई,दिनेश खेडकर,विनोद देशमुख,विनोद अंबर्ते यांनी अथक परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.