मालखेड रेल्वे येथील श्री गजानन महाराज मंदिरात पारायण सोहळा

दि. ०८ अमरावती/प्रतिनिधी –

चांदुर रेल्वे तालुक्यातील मालखेड रेल्वे गावातील गजानन महाराज मंदिरात 268 भक्तांनी महापरायण केले. या महापरायणाचे आयोजन भिवाजी बीजवे मेमोरियल ट्रस्ट व मालखेड मधील गावकऱ्यांनी केले होते. अतिशय शांततापूर्वक कार्यक्रम संपन्न झाला असून या महापरायणात नागपूर येथील 55 भक्तांनि सहभाग घेतला होता सकाळी 6 ते 12 पर्यंत महापरायण 12 ते 1 महाआरती व 1 ते 4 प्रसादाचे आयोजन केले गेले होते. या महापरायणामुळे मालखेड मध्ये नागरिकानी शेगावची प्रचिती अनुभवली. 2 महिन्याच्या अथक परिश्रमात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या भक्तिमय कार्यक्रमा मूळे गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले. या महापरायणाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने भिवाजी मेमोरियल ट्रस्ट तर्फे श्री रंजन श्रीराम बीजवे,नागपूर चे पारायण मंडळाचे चांदुभाऊ छत्रपाल तसेच मालखेड चे सरपंच अशोकभाऊ रोडगे मनीष जयस्वाल आणि गावातील समस्त तरुण मित्रमंडळी नि मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.