तिवसा येथील पंचशील धम्म यात्रेत उसळला जनसागर

दि. ०८ अमरावती/प्रतिनिधी –

पंचशील धम्म ध्वज दिना निमित्ताने तिवसा येथील आनंदवाडी परिसरात पंचशील धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज मंगळवार सकाळी शांती संदेश रॅली काढण्यात आली होती यावेळी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हजारो भीम सैनिकांनी यात सहभागी होऊन शांतीचा दिला. गेल्या १७वर्षांपासून तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचे आयोजन करण्यात येते विदर्भात ही एकमेव यात्रा असून ६ते८जानेवारी पर्यंत ही यात्रा भरते यात राज्यातील लाखो भीम सैनिक एकत्र येत असून प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात येते आज सकाळी१०वाजता तिवसा येथील डॉ.आंबेडकर सभागृहा पासून या शांती संदेश रॅलीला सुरवात करण्यात आले यात शहरात रॅली फिरण्यात आल्या नंतर या रॅलीचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिला तिन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात राज्यभरातुन लाखो भीम सैनिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.