सीमा सावळे यांच्याकडून दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे मोफत वाटप

सीमा सावळे यांच्याकडून दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे मोफत वाटप

अमरावती, दि. १० (प्रतिनिधी) –
दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या अमरावती शहरातील १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना स्थायी समिती माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांच्या वतीने मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. हे पुस्तक दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे यासाठी स्थायी समिती माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या शहरातील दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे मोफत वाटप करण्याचा निश्चय केला. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. दहावीच्या परीक्षेतील प्रत्येक विषयाचा पेपर सोडवण्यासाठी या मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे. या पुस्तकातील प्रश्न सोडवण्याचा सराव केल्याने दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे सोपे होणार आहे. तसेच अवघड वाटणारे गणित, इंग्रजी आणि विज्ञान पेपर सोप्या पद्धतीने सोडवण्याचा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे सीमा सावळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.