केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत

  संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी होणार अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण

अमरावती, दि. 7 :

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या मंगळवार, दि. 11 सप्टेंबरला अमरावती दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण  होणार आहे.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार ॲड. यशोमती ठाकूर आदी यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मॅराथॉन धावपटू लता करे, चाळीसगाव येथील उद्योजिका मीनाक्षी निकम, अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुचेता धामणे यांना अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

  केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा कार्यक्रम

 केंद्रिय संरक्षण मंत्र्यांचे दि. 11 सप्टेंबरला स. 10.25 वाजता विमानाने दिल्ली येथून नागपूरकडे प्रयाण होईल. दु. 12.10 वा. नागपूर येथे आगमन होईल. दु. 12.15 वाजता नागपूर येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. दु. 1.50 वाजता अमरावती येथे आगमन. दु. 2 ते 4.45 वाजता अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित. सायं. 5 वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूर विमानतळाकडे रवाना.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या