पाथरीतील ज्ञानेश्वर नगरात धाडसी चोरी

पाथरीतील ज्ञानेश्वर नगरात धाडसी चोरी.
घरात घुसत दमदाटी करून दोन लक्ष सोळा हजारांचा मुद्दे माल पळवला
वरीष्ठ पोलीस अधिका-यांनी दिल्या भेटी

दि 9 पाथरी – प्रतिनिधी

पाथरी शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून शनीवार ८ सप्टेबर च्या पहाटे पाथरी शहरातील ज्ञानेश्वर नगर मधील एका घरात अज्ञात पाच चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडत हातात लोखंडी रॉड घेऊन दमदाटी करत सोन्याच्या दागिन्यां सह नगदी सत्तर हजार असा जवळपास दोन लक्ष सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या विषयी देवनांद्रा माध्समिक विद्यालयात सेवक म्हणून कार्यरत असलेले सुभाष नागोराव गरड वय ५५ रा ज्ञानेश्वर नगर देवनांद्रा पाथरी यांनी दिलेल्या माहिती नुसास शुक्रवारी शुक्रवार ७ सप्टेबर रोजी जेवन झाल्या नंतर रात्री दहाच्या सुमारास ते त्यांच्या घराचे चॅनल गेट लाऊन झोपले या वेळी सुभाष गरड त्यांच्या पत्नी लताबाई आणि नुकतीच बाळंत झालेली त्यांची मुलगी वर्षा असे दोन वेगवेगळ्या खोल्यां मध्ये झोपले होते,पहाटे तीन च्या सुमारास लोखंडी चॅनल गेट चे कुलूप तोडून पाच अज्ञात चोरट्यांनी गरड यांच्या घरात प्रवेश केला. त्या नंतर सुभाष गरड झोपलेल्या खोलीचा दरवाजा लोखंडी सळईच्या साह्याने कोंडा तोडून घरात प्रवेश केला. या वेळी आवाज आल्याने आणि बल्ब चालू केल्याने गरड जागे झाले असता एक जन दरवाज्या बाहेर आणि दोघेजन पत्नी,मुलगी असलेल्या खोलीत तर दोघे सुभाष गरड यांना दमदाटी लोखंडी सळईचा धाक दाखवत दमदाटी करत कपाटाच्या चाव्या मागत होते गरड यांनी पत्नीला कपाटाच्या चाव्या देण्यास सांगितले सा वेळी कपाट उघडून मधले लॉकर उघडत नसल्याने त्यांनी लोखंडी सळईच्या साह्याने ते तोडून लहान बाळाच्या अंगावरील दागिन्यां सह दोन्ही महिलांचे मनीमंगळ सुत्र आणि कपाटातील सोन्याचा हार ३५ हजार रुपये, सोने साखळी ५० हजार रुपये, सोन्याची कर्ण फुले १२ हजार पाचशे रुपये, सोने हार २५ हजार रुपये, सोने मंगळसुत्र लहान पोत दहा हजार रुपये किंमतीचे,एक ग्राम चा ओम आणि डूल पाच हजार रुपये किंमतीचे दागिने, इवो कंपनीचा जिओ कार्ड असलेला मोबाईल ज्याची किंमत ९ हजार रुपये आहे. सत्तर हजार रुपये नगदी त्यात दोन हजाराच्या तीन नोटा उर्वरीत पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा असा एकत्रीत दोन लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा नगदी मुद्देमाल या पाच चोरट्यांनी पळवला या वेळी सुभाष गरड यांनी प्रसंग ओळखल्या ने या चोरट्यांनी त्यांना आणि कुटूंबाला इजा केली नाही. यात दोघे चड्डी बनियान वर तर एक जन काळा जॅकेट काळी पॅट घातलेला होता यानेच कपाटातील एैवज लुटला तर दुसरा पांढरा शर्ट ट्रावझर घालून हातात लोखंडी टांबी होती तर महिलांना दमदाटी करणा-या चड्डी धारकांच्या हातत लोखंडी सळया होत्या असे सुभाष गरड आणि त्यांच्या पत्नीने सांगितले. बाहेर एकजन मात्र अंधारात उभा असल्याने त्याचा पेहराव ओळखायला येत न्हवता असे गरड सांगत होते. या वेळी हे चोरटे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बोलून दमदाटी करत होते.हा थरार दहा मिनिटे चालला या नंतर चोरट्यांनी घरा बाहेर जात संपुर्ण दरवाजे बाहेरून लावत या नगराच्या उत्तर दिशेला असलेल्या हानुमान मंदिरा कडून पलायन केले. यानंतर शेजा-या पाजा-यांना फोन करून माहीती दिली त्यातील एकाने पाथरी पोलीसांना ही माहिती फोन वरून दिली पाथरी पोलीसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत या ठिकाणी स्वान पथक,ठसे तज्ञ यांना पाचारण केले. या वेळी मारोती मंदिराच्या नाली पर्यंत श्वानाने मार्ग दाखवला. पाथ्री पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.