गडचिरोलीत बसला अपघात 11 प्रवासी जखमी

गडचिरोलीत बसला अपघात 11 प्रवासी जखमी

दि 9 गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात भामरागड तालुक्यात  भामरागड मार्गावर  कोठी – अहेरी बस पलटली असून या अपघातात ११ प्रवासी  जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही बस चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

एमएच ०६ एस ८८३५ क्रमांकाची अहेरी आगाराची बस अहेरी येथून कोठी येथे काल ८ सप्टेंबर रोजी पोहचली. रात्री मुक्कामी राहिल्यानंतर बस प्रवासी घेवून आज ९  सप्टेंबर रोजी सकाळी निघाली. दरम्यान कारमपल्ली वळणाजवळ बस आल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. या ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला. माती टाकण्यात आली मात्र दाबण्यात आली नाही. यामुळे बसची चाके रूतली आणि बस एका बाजूला होत पलटली. तसेच चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहकच बस चालवत होता अशी माहीती पुढे आलीय.. यामुळे या अपघाताला कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि चालक व वाहक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.