संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा अमरावती दौरा रद्द

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा अमरावती दौरा रद्द

दि. 10 अमरावती,
केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा मंगळवार, दि. 11 सप्टेंबर रोजीचा अमरावती येथील दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयाने कळवली आहे.चीन आणि अमेरिका या देशाचे एक शिस्ट मंडळ संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीला येणार असून केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या त्यांची एक महत्वाची बेठक होणार असल्याची माहिती आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनहस्ते राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण  होणार होते

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार होता मात्र आता या सोहळ्याला सिने अभिनेत्री अनिता राज यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे तर या सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार ॲड. यशोमती ठाकूर आदी यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मॅराथॉन धावपटू लता करे, चाळीसगाव येथील उद्योजिका मीनाक्षी निकम, अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुचेता धामणे यांना अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.