वालुरातील पेट्रोल पंपावर चोरी: अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल..

वालुरातील पेट्रोल पंपावर चोरी: अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल…
दि 11 परभणी प्रतिनिधी
वालुर(ता.सेलू) येथील सागर सुरेंद्र तोष्णिवाल यांच्या मालकीचे सारीष फिलिंग स्टेशन इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरवर अज्ञात दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून पंपावरील कर्मचा-या कडून जवळपास १लाख एक हजार रुपये रोख रक्कम व पंधरा हजार रुपये किमंतीचे असे एकुण १लाख सोळा हजार रुपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.११)सकाळी पावनेतीनच्या सुमारास घडली.
घटनेने वालुर गावात खळबळ उडाली आहे. या बाबतची पोलिस सूत्रांनी देलेली माहिती अशी की वालुर येथील सेलू-राजेवाडी रस्त्यावरील सागर सुरेंद्र तोषनीवाल यांच्या मालकीच्या असलेल्या सारीश फिलिंग स्टेशन या पेट्रोल पंपावर आज पहाटे पावनेतीनच्या सुमारास पेट्रोल पंपवरील झोपलेल्या कर्मचा-यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गल्ल्यातील एक लाख एक हजार रुपये व त्यांच्या जवळ असलेले 3 मोबाईल असे एकूण एक लाख 16 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लांबविला. घडलेल्या घटनेची माहिती कर्मचारी यांनी पेट्रोल पंपाचे मालक तोष्णीवाल यांनी दिली. पोलीसांना घटने बाबत कळविण्यात आल्यावर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके आपल्या सहका-यासह घटनास्थळी दाखल झाले. परभणी हुन श्वान पथक ही आले होते.या प्रकरणात परभणीचे साह्यक पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे,सेलू येथील उप विभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे जिंतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर,यांनी घटनास्थळी भेट दिली. पेट्रोल पंपाचे मालक सागर तोष्णिवाल यांचे बंधु शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सेलू पोलीस ठाण्यात मालक अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम३९२, ४५७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
I

Leave a Reply

Your email address will not be published.