परभणीत पेट्रोल नव्वदी पार

परभणीत पेट्रोल नव्वदी पार
प्रती लीटर ९०.२९ रूपयांचा दर

दि 11 परभणी
परभणी जिल्ह्यात पेट्रल दरवाढीने ऐतिहासिक
उच्चांक गाठत मंगळवारी (ता.११) नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रती लीटर ९०.२९ रूपयांच्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे.ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमूक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील
पेट्रोलवाढीवर प्रशासनाने नियंत्रण नाही. सोमवारी पेट्रोल ८९.९७ रूपये होते तर डिझेल ७७.९३ प्रति लीटर होते. मंगळवारी पेट्रोलपंप
चालकांनी हद्य पार केली. त्याविरूद्ध विरोधी पक्षांकडून सोमवारी (ता.११) जिल्हाबंद ठेवूनही उपयोग झाला नाही. तूर्तास देशात सर्वाधिक महाग पेट्रोल जिल्ह्यात मिळत असून त्यात दिवसेंदिवस
वाढच होऊ लागली. विशेषतः चार वर्षांपूर्वी कच्चा तेलाचे जे दर होते, तेच आजघडीला आहेत. उलट तेलडेपोचे अंतर लांब असल्याचे कारण समोर केले जात आहे. तरीही वाहतूक खर्चासह राज्य
शासनाचा कर आणि व्हॅटचा बोजाही ग्राहकांवर टाकण्यात आला. हे कमी असताना शासन पेट्रोलवर जीसएसटी लावण्यास तयार नाही.
ती लावल्यास जवळपास २० रूपयांची घसरण प्रति लिटरमागे पाहवयास मिळेल. 

 

Leave a Reply

Your email address will not be published.