सेल्फी च्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर

सेल्फी च्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर

दि 20 यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक एक दिवस आधीच आले होते , सकाळी साडे नऊ वाजता हे पाच युवक सवारी च्या बंगल्या मागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळी साठी गेले व त्या आधी तिथे एक नाव पाण्यात होती ,त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा झाली ,या पाचही युवकांनी त्या नावेवर बसून सेल्फी काढतांना त्या नावेचा तोल जाऊन हे युवक पाण्यात बुडाले , तिथे खोल डोह होता ,या नवीन लोकांना माहीत नव्हते ,त्यापैकी
शेख अर्षद वय 14 ,शेख सुफिर सिराज वय 16,हे दोघे मरण पावले तर सय्यद उमेद वय 18 हा गंभीर असल्याने त्याला मुकुटंबन येथील प्राथमिक रुग्णालयातून उपचार करून वणी ला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आहे ,तर यातील दोघांनी पोहता येत असल्याने आपला जीव वाचविला ,हे सर्वच जण तेलंगणातील आदीलाबद येथील आहे ,त्यांचा परिवार दरवर्षी राजूर येथे मोहरम सणानिमित्त आला होता


घटना ही राजूर पासून हाकेच्या अंतरावर च होती व बाजूलाच असलेल्या मच्छिमाराने आरडा ओरड करून गावाला माहिती दिली व राजूर येथील युवकांनी तात्काळ या तिघांना मुकुटंबन प्राथमिक रुग्णालयात दाखल केले ,डॉक्टर नी दोघांना मृत घोषित केले असून एकाला वणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले अधीक तपास मुकुटबन पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.