आयएनएसच्या कार्यकारिणीवर दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे बिनविरोध

आयएनएसच्या कार्यकारिणीवर दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे बिनविरोध
अमरावती दि 29 (प्रतिनिधी)
: देशातील वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था
इंडियन न्यूज पेपर सोसायटी नवी दिल्लीच्या (आयएनएस) कार्यकारिणीत
दै.हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास अ. मराठे यांची बिनविरोध निवड
करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्ष पदी केरळमधील मल्ल्याळम मनोरमाचे
जयंत मेमन मॅथ्यु यांची तर डेप्युटी प्रेसिडेंट पदावर मीड डे
वर्तमानपत्राचे शैलेश गुप्ता, उपाध्यक्ष पदी चेन्नई येथील दिन मल्लारचे
एल. अदीमुलम यांची निवड करण्यात आली आहे.
विलास अ. मराठे यांची आयएनएसच्या कार्यकारिणीवर सलग 16 व्यांदा निवड झाली
आहे. या कार्यकारिणीत दै. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माजी खासदार
विजय दर्डा यांचा देखील समावेश आहे. बँगलोर येथे झालेल्या 79 व्या
वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. विलास अ. मराठे राज्य शासनाच्या राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य, श्री. अंबादेवी
संस्थानचे विश्‍वस्त, सातुर्णा औद्योगिक औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे संचालक, शासकीय मुलींच्या आयटीआयचे संचालक, जोग चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त असून त्यांनी भारत सरकारच्या माहीती व जनसंपर्क मंत्रालयाच्या डीएव्हीपी (केंद्र शासनाची जाहीरात वितरण करणारी संस्था) चे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. विलास मराठे दै. हिंदुस्थानचे संस्थापक व संपादक थोर स्वातंत्र्य सेनानी पत्रमहर्षि बाळासाहेब मराठे यांचे नातू व दै. हिंदुस्थानचे दिवंगत संपादक डॉ. अरूण मराठे यांचे चिरंजीव आहेत.
श्री. विलास अ. मराठे यांच्या निवडीबद्दल अमरावतीसह पश्‍चिम विदर्भातील
पत्रकारसृष्टीमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर समाजातील
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.