६१ व्या वार्षिक परिषदेचा थाटात शुभारंभ

विकासात्मक संशोधनात भारताची यशस्वी वाटचाल – केंद्रीय मंत्री हंसराज अहिर
द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स संस्थेच्या ६१ व्या वार्षिक परिषदेचा थाटात शुभारंभ

दि २९ अमरावती प्रतिनिधी

भारत हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण होत असून विकासात्मक संशोधनाच्या दृष्टीने भारतात परिस्थिती निर्माण होत असल्याचा विश्वास देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अमरावती येथे व्यक्त केला. द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स संस्थेच्या ६१ व्या वार्षिक परिषदेत अहिर बोलत होते.
अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीतर्फे संचालित प्राध्यापक राम मेघे इन्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथे द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स संस्थेचा ६१ वा वार्षिक समारंभ पार पडला. देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात विकासात्मक संशोधनाला प्राधान्य दिले जात असून त्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मात्र अद्यापही ऊर्जा, संरक्षण, दूरसंचार, या क्षेत्रांमध्ये बरेच काम करण्याची गरज असल्याचेहि हंसराज अहिर यावेळी म्हणाले. भारतात बुद्धिमत्तेची कमतरता नसून भारत आता नव्या जोमाने प्रगती करत असल्याचं संपूर्ण जगाने मान्य केले असल्याचेही अहिर यावेळी म्हणाले.तर मा. डॉ. नितीन धांडे यांनी आपल्या भाषणात मा. हंसराजजी अहीर यांचे कार्यक्रमास उपस्थित राहल्याबद्दल आभार मानले व उपस्थित सर्व सन्माननिय शास्त्रज्ञांचे स्वागत केले.

डॉ. हुडा यांनी तांत्रीक बाबी व उद्याचे तंत्रज्ञान व महाविद्यालय यांच्यातील दरी दुर करणे आवश्यक असल्याचे सांगितले व अमरावती आय.ई.टी.ई. चे कौतुक केले.यावेळी पद्मश्री ले. कर्नल दिवाकर सेन यांनी डॉ. शिवम यांचा जीवन परिचय दिला व त्यांचे शोधकार्य समजावुन सांगितले. डॉ. टी. एस. चौधरी यांच्या कार्याची माहीती दीली. पद्मश्री डॉ. टी हनुमान चौधरी यांना त्यांच्या कार्याबद्दल जिवन गौरव पुरस्कार देण्यात आला. आर. के. गुप्ता, दुरदर्शन यांना सुध्दा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच आर. के. गुप्ता यांचा जिवन परीचय यावेळी देण्यात आला. फ्री टु ऐयर ही संकल्पना त्यांची असुन ब्रॉड कास्टींगच्या विश्वात त्यांचे कार्य बहुमुल्य आहे.यावेळी डी.आर.डी.ओ. चे के. लक्ष्मीनारायण यांचा जीवन परीचय देण्यात आला त्यांनी डी.आर.डी.ओ. मध्ये 37 वर्षे प्रकल्प संचालक म्हणुन सेवा दिली यावेळी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
तसेच डॉ. एन. एच. कोरी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यांनी 40 वर्षे आपली टेलीकम्युनीकेशनला सेवा दिली तसेच संशोधन केले. या वेळी दिल्ली आय.ई.टी.ई. सेंटरला उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक पुरस्कार बँगलोर या देण्यात आला. उपकेंद्राचा पुरस्कार यवतमाळ केंद्राला देण्यात आला.यावेळी पालकमंत्री मा. प्रविण पोटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांनी आय.ई.टी.ई. चे अभिनंदन व कौतुक केले व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती चे कौतुक केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन हेशहितामध्ये आहे. अविष्कार व संशोधन आपल्या भारताची परंपरा असल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाला आलेल्या संशोधकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निकु खालसा व प्रा. मैथीली देशमुख यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रयान 2 चे उपसंचालक डॉ. चंद्रकांता कुमार, इस्त्रोचे संचालक सिवन त्याचप्रमाणे ट्रायचे माजी अध्यक्ष चौधरी तसेच अमेरीकेहुन हॉडली विद्यापीठाचे डॉ. प्रसाद शास्त्री व वेललॅबचे माजी संचालक डॉ. एम. एच. कोरी, डॉ. कासट, डॉ. अजय ठाकरे, प्रा. संजय धोपटे, डॉ. एच. आर. देशमुख व आय.ई.टी.ई. चे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.