विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी व मायेची उब रोटरी क्लब चा पुढाकार;

विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी व मायेची उब रोटरी क्लब चा पुढाकार;

दि ३० – मालखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांना लोकसहभाग मिळावा व यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक झटत आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी मिळावे व येणाऱ्या हिवाळ्यात थंडी पासून स्वरक्षण व्हावे यासाठी रोटरी क्लब अमरावती ने पुढाकार घेत त्यांना वाटर फिल्टर व स्वेटर वाटप करुन एकप्रकारची मायेचीच उब दिली आहे.
सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब तर्फे ओमप्रकाश सिकची यांनी वॉटर फिल्टर व सुशील सिकची यांनी स्वेटर दान केले यावेळी झालेल्या कार्यक्रमात उदघाटक म्हणून रोटरी क्लबचे राजेश शर्मा अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेश झिमटे व प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष यादव, स्मिता सिकची,गोपाल नावंदर, प्रसाद मोरे, लता कासट यांच्यासह गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, विस्तार अधिकारी श्रीमती सोळंके उपस्थित होते
शाळेतील सर्व 120 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले तसेच वॉटर फिल्टर चे हि उदघाटन करण्यात आले, शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ते सह जास्तीत जास्त भौतिक सुविधा मिळाव्या यासाठी झटणारे शाळेतील शिक्षक कुणाल ठाकरे, अतुल सोनार, धीरज धावडे यांचे हि गावकऱ्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.